हुक्केरी तालुक्यातील बेनीवाड ग्रामपंचायतीच्या अध्यक्षपदी लक्ष्मी दिपक हरिजन व उपाध्यक्षपदी गंगा इरण्णा कुंभार यांची बिनविरोध निवड झाली.
व्हॉईस ओव्हर : बुधवारी झालेल्या निवडणूक प्रक्रियेत अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी प्रत्येकी एकाच उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणूक अधिकारी एच.ए.माहुत यांनी बिनविरोध निवडणूक जाहीर केली.
नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी सत्कार व अभिनंदन केले. (फ्लो)
त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नूतन अध्यक्षा लक्ष्मी हरिजन यांनी सांगितले की, गावातील ज्येष्ठ व सदस्यांचे मार्गदर्शन व सल्ल्याने गावाच्या विकासासाठी सहकार्य केले जाईल.
अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत विकास अधिकारी पी.ए.कांबळे होते.
यावेळी गावातील जेष्ठ अशोक पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे निवडणूक बिनविरोध निवड झाली, सत्यप्पा हेब्बाळे, रायप्पा मगदुम्म, महानिंग सनदी, दुंडप्पा हेब्बली, महांतेश नाईक व सर्व सदस्य उपस्थित होते.



Recent Comments