Belagavi

निसर्गाचे संतुलन आणि पर्यावरण वाचवण्यासाठी लावा झाडे : शिवाजीराव कागणीकर

Share

पुढच्या पिढीला पर्यावरणातील बदलांमुळे वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागता कामा नये यासाठी प्रयेकानं पर्यावरणाचा तोल ढासळू नये यासाठी झाडे लावून ती जगवावीत असे आवाहन पर्यावरणवादी शिवाजी कागणीकर यांनी केले .


व्हॉईस ओव्हर : शहरातील लिंगराज महाविद्यालयात आयोजित केलेल्या ” शाश्वत पर्यावरण विकासाच्या दिशेने ” या कार्यक्रमांत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते ..
ते पुढे म्हणाले कि , आमच्या पिढीच्या काळात पर्यावरण प्रदूषण , नैसर्गिक आपत्ती असे प्रकार कधीच उद्भवलेले किंवा आम्ही ऐकलेले नाहीत . जेव्हापासून मानवाने निर्णयावर अतिक्रमण करण्यास सुरुवात केली तेव्हापासून नैसर्गिक आपत्ती निर्माण होऊ लागल्या तसेच जागतिक तापमानात वाढ होऊ लागली . मानवाने आपल्या स्वार्थासाठी बेसुमार जंगलतोड केली . आणि त्या ठिकाणी काँक्रीटचे जंगल उभारले . त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी होऊन , तापमानात वाढ झाली . आपण सर्वानी नुकतीच तेही तापमान वाढ अनुभवली आहे . जुलै महिना सुरु होऊन देखील पावसाचा पत्ता नाही . हे सर्व मानवनिर्मिताचा आहे . पर्यावरणीय बदलांमुळे मानवजातीबरोबरच , पशुपक्षांना देखील आपत्तींना तोंड द्यावे लागत आहे . हवा प्रदूषण , पाणी प्रदूषण , त्याचप्रमाणे जमिनीचे प्रदूषण देखील वाढले आहे . त्यामुळे झाडे लावून , त्यांचे योग्य संगोपन करून निसर्गाची होणारी हानी रोखावी , आणि आपल्या पुढच्या पिढीला सुंदर , स्वच्छ निसर्गाची देणगी द्यावी असे आवाहन त्यांनी केले . ( )
यावेळी , राणी चन्नम्मा विद्यापीठाचे समाजशास्त्र विभागाचे चेअरमन सुमंत हिरेमठ , नवीन कणबर्गी , विभा हेगडे , रश्मी बिरादार , एच एस मेलींनमनी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Tags: