Belagavi

ऐन पावसाळयात ड्रेनेज बांधकामासाठी खोदला रस्ता , विद्यार्थ्यांसहित रहिवाशांचे हाल

Share

बेळगाव शहरातील संत मीरा शाळेनजीकच्या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे . पावसामुळे हा रस्ता पूर्णतः चिखलमय आला आहे . वाहनधारकांसहित पादचाऱ्यांना या रस्त्यावरून जाणे मुश्किल बनले आहे

.: या रस्त्याची ड्रेनेज बांधकामासाठी खोदाई करण्यात आली आहे . पाऊस सुरु झाल्याने , या खोदलेल्या रस्त्यावर संपूर्ण चिखल साचला आहे . याच रस्त्यावरून शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे खूप हाल होत आहेत . रस्त्यावरून पाण्याचे पाट वाहत आहेत . मातीचे ढिगारे रस्त्यावरच असल्याने यातून वाट काढताना वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे .
यासंबंधी शालेय विध्यार्थ्यानी या रस्त्याच्या अर्धवट कामकाजामुळे विद्यार्थ्याने कसा त्रास होत आहे याची कल्पना दिली . तसेच हे अर्धवट कामकाज पूर्ण करण्याची मागणी केली


ऐन पावसाळ्यात ड्रेनेजचे काम करण्यासाठी इथल्या रस्त्याची खोदाई करण्यात आली आहे . रहिवाशांसहित , इथून जाणाऱ्या लोकांना होणारा त्रास टाळण्यासाठी हे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली जात आहे .

Tags: