Dharwad

धारवाड जिल्ह्यात पावसामुळे शाळेचे छत कोसळले : चार विद्यार्थी जखमी

Share

धारवाड जिल्ह्यातील बोगुर गावातील सरकारी शाळेत छत कोसळून चार विद्यार्थी जखमी झाले.सततच्या पावसामुळे आता जीर्ण शाळांतील विध्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. बोगुर गावातील शासकीय वरिष्ठ प्राथमिक शाळेचे छत कोसळून चार विध्यार्थी जखमी झाले. शाळेची इमारत जुनी असल्याने ही घटना घडली. या शाळेच्या आणखी जवळपास तीन खोल्या पडण्याच्या मार्गावर आहेत. चार जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी गरग रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Tags: