लोकसभा निवडणुकीत भाजप आणि संघ परिवाराच्या शक्तींचा पराभव झाला पाहिजे, या संदर्भात विविध संघटनांची 22 जुलै रोजी पुणे येथे बैठक होणार आहे अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते एस. आर. हिरेमठ यांनी दिली.

धारवाड येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना हिरेमठ म्हणाले की, सिटीझन फॉर डेमोक्रसी आणि जनआंदोलन महामैत्री यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील पुणे येथे विविध संघटनांची 22 जुलै रोजी बैठक होणार आहे. 5 आणि 6 ऑगस्ट रोजी नवी दिल्लीतील गांधी पीस फाउंडेशनमध्ये आमची राष्ट्रीय परिषद होणार आहे. त्याच्या पूर्वतयारीसाठी ही बैठक होणार असून त्याला महाराष्ट्र नागरी संस्था पाठिंबा देत असल्याचे त्यांनी सांगितले.
या राष्ट्रीय परिषदेत भाजपचा पराभव करण्यावर चर्चा करण्यात येणार आहे. यावेळी आम्ही कर्नाटकात भाजपचा पराभव केला आहे. त्याच धर्तीवर लोकसभा निवडणुकीतही पराभव झाला पाहिजे, असे ते म्हणाले.


Recent Comments