बेळगाव शहरातील हुक्केरी हिरेमठ शाखेत सोमवारी रोटरी क्लब ऑफ बेळगाव सेंट्रलच्या नूतन अध्यक्षपदी निवड झालेल्या मंजुनाथ अळवाणी यांचा श्री चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी यांनी सत्कार करून आशीर्वाद दिला .

यावेळी बोलताना श्री चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी म्हणाले कि , सत्ता ही संधीसारखी असते. या संधी कालावधीत सार्वजनिक कामे करावीत. रोटरी क्लब दलित, वृद्ध, शाळकरी मुलांच्या हितासाठी उपक्रम राबवत आहे. मंजुनाथ अळवाणी यांनी अधिकाधिक सामाजिक कार्य करून सर्वांची मने जिंकावीत, अशा शुभेच्छा दिल्या.
सत्कार स्वीकारल्यानंतर रोटरी क्लबचे नूतन अध्यक्ष मंजुनाथ अळवाणी म्हणाले कि , श्री चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी नेहमी त्यांच्या क्षेत्रात कसे वागावे याचे मार्गदर्शन करतात. रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी माझी निवड झाल्यानंतर त्यांनी मला निमंत्रित केले, आशीर्वाद दिले आणि मला परोपकारी कार्य करण्यासाठी मार्गदर्शन केले. आमच्या सर्व सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली मी नक्कीच उत्तम काम करेन. आमचे पदाधिकारी उत्साही आहेत.
ते म्हणाले, “लोक कौतुक करतील आणि गुरू दाद देतील असे काम मी करेन.”
यावेळी , बंगळुरू येथील डॉ. के. भीमा, अप्पाजी गौडा, रवींद्र कुमार, प्रवीण, बेळगावचे कल्लाप्पा बोरन्नवर, गुलेदगुड्ड येथील श्रीधर शेट्टर, हारुगेरी येथील वीराण्णागौडा पाटील, जमखंडीचे बसवराज कजगार , प्रसिद्ध वास्तुतज्ज्ञ श्रीधर परिमाचार्य बेल्लारी आदी उपस्थित होते.


Recent Comments