Crime

तरुणाला विवस्त्र करून मारहाण केल्याप्रकरणी आतापर्यंत दहा जणांना अटक

Share

तरुणाला विवस्त्र करून मारहाण केल्याप्रकरणी आणखी तिघांना अटक करण्यात आली असून, अटक झालेल्यांची संख्या 10 झाली असून, अटकेतील आरोपींचा आकडा वाढतच चालला आहे.

 

यापूर्वीच ह्या प्रकरणात महानगर पालिका सदस्या मंजुळा जाधव यांच्या दोन मुलांना पोलिसांनी अटक करून तुरुंगात पाठवले आहे. दररोज एक व्हिडिओ समोर येत असल्याने आरोपींची संख्या वाढत आहे.

संदीप साळुंके नावाच्या तरुणाला विवस्त्र करून मारहाण करण्यात आली. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भेंडिगेरी पोलीस ठाण्यात सात आरोपींना अटक करण्यात आली असून अन्य तिघांना अटक करण्यात आली आहे. निरीक्षक जयपाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली अटक केली.

यमनूर यारकल, कार्तिक जबलापुर, पवन इंदरगी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. बेंडीगेरी पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरूच असून, मारहाण झालेल्या संदीपने पोलिसांच्या तपासात योग्य सहकार्य केले नाही, ही डोकेदुखी आहे.

Tags: