Education

विजापुरात आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या अभाविप नेत्याला पोलिसांकडून धक्काबुक्की

Share

विजापूर शहरातील गांधी सर्कलमध्ये, रस्त्यावर बोर्ड आणि डेस्क लावा आणि विद्यार्थ्यांना शिकवा या आंदोलनाचे आयोजन करणार्या अभाविप नेता सचिनला पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली .


विजापूर शहरातील शासकीय महिला महाविद्यालयात वर्गखोल्या नसल्याच्या विरोधात अभाविपकडून आंदोलन करण्यात आले होते . शहरातील गांधी चौकात आयोजित केलेल्या या आंदोलनात , शासकीय पदवीपूर्व महिला महाविद्यालयातील शेकडो विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या . विद्यार्थ्यांनी अर्ध्या तासाहून अधिक वेळ रास्ता रोको केल्याने पोलिसांची बाचाबाची झाली .

यावेळी , गांधी चौक सीपीआय सिद्धेश यांनी , अभाविप नेता सचिन याला धक्काबुक्की करून , पोलिसांनी सचिनला ओढत पोलिस ठाण्यात नेण्याचा प्रयत्न केला

यावेळी या ठिकाणी एकच गोंधळ उडाला. महाविद्यालयात पुरेशा खोल्या बांधण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले होते . शासकीय महिला पदवीपूर्व महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी अभाविप संघटनेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांनी आपला संताप व्यक्त केला . शहरातील गांधी चौकात केलेल्या रास्ता रोकोमुळे वाहतुकीची कोंडी झाली होती .

 

Tags: