विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी विविध उपाय योजना आखून अतिशय जबाबदारीने कार्य करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यांच्यावर स्काऊट आणि गाईड्सच्या माध्यमातून समाजसेवेचे संस्कार करणे गरजेचे आहे असे आवाहन माजी मंत्री आणि भारत स्काऊट अँड गाईडचे राज्य मुख्य आयुक्त पी. जी. आर. सिंदिया यांनी केले.
बेळगावात भारत स्काऊट अँड गाईड आणि रोव्हर रेंजर प्रशिक्षण शिबिराचे उदघाटन केल्यानंतर बोलताना माजी मंत्री पी जी आर सिंदिया पुढे म्हणाले की, समाजाचा अतिशय जबाबदारीचा घटक म्हणजे शिक्षक आहे त्याची जाणीव प्रत्येक शिक्षकाला असायला हवी. देशात कर्नाटक राज्याचे शिक्षण क्षेत्रातील योगदान अतिशय चांगले आहे. समाजसेवा करण्याची संधी स्काऊट गाईड रोवर रेंजर सारख्या संस्थांमधून मिळते. त्यामुळे विध्यार्थ्यांना त्यात रस निर्माण केला पाहिजे. दिवसेंदिवस हरवत चाललेली नैतिकता मूल्ये तत्त्व आणि विचार ते समाजाला देणे आज काळाची गरज आहे आणि ही जबाबदारी शिक्षकांची आहे असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे शिक्षण खात्याचे धारवाड येथील सहसंचालक आणि भारत स्काऊट गाईडचे बेळगाव जिल्ह्याचे चीफ कमिशनर गजानन मन्नीकेरी यांनी स्काऊट गाईड रोव्हर रेंजर शिबिराचे महत्व पटवून दिले.
निलेश शिंदे, प्रा. राजेश आवलक्की, अन्नपूर्णा कुरबेट, प्रा. प्रकाश पाटील रिसोर्स पर्सन म्हणून लाभले होते. सेंट अँथोनी हायस्कूलच्या प्राचार्य मारी फिल्ड, भारती पाटील, प्रतिभा पाटील व्यासपीठावर उपस्थित होत्या. मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून तसेच दीप प्रज्वलनाने शिबिराचे उदघाटन करण्यात आले. यावेळी सर्व मान्यवरांनी विचार मांडले.
अनिल पाटील, प्रा. संदीप पाटील, मयूर नागेनट्टी, श्रीधर हिरेमठ एम.पी, उपिन, मार्गारेट डिसोजा, अजित पाटील, श्रीधर पाटील, प्रा नारायण पाटील, प्रा उदय पाटील, प्रा. के. एल. शिंदे, प्रा. कोंडूस्कोप, महेश पुजारी, लक्ष्मण बांडगे उपस्थित होते.


Recent Comments