Belagavi

रिंग रोड, हलगा-मच्छे बायपास रस्त्याचे काम सुरू करणार : मंत्री सतीश जारकीहोळी

Share

बेळगावचा रिंग रोड आणि हलगा-मच्छे बायपास रस्त्याचे काम सुरू करण्यात येईल, त्याचप्रमाणे बुडामधील भ्रष्टाचार आणि खाऊकट्टयातील अनियमिततेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल अशी माहिती जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली.

बेळगाव येथील काँग्रेस कार्यालयात शनिवारी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत मंत्री जारकीहोळी यांनी बेळगाव रिंग रोड आणि बायपास अटळ असल्याचे संकेत दिले. कामाला दिरंगाई झाल्याने ठेकेदार काम सोडून गेला आहे. याबाबत आम्ही राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांना सांगितले असून, त्याच कंत्राटदाराला काम देण्यास मी सांगितले आहे. आता केंद्र सरकारने निर्णय घ्यायचा आहे. बेळगाव रिंगरोडचे काम सुरू आहे. बुडामधील बुडामधील भ्रष्टाचार, खाऊकट्ट्यातील अनियमिततेची चौकशी करण्यात येणार आहे. याबाबत लोकायुक्तांकडे खासगी तक्रार दाखल करण्यात आली आहे. बंगळुरूहून अधिकारी चौकशीसाठी येणार आहेत. सचिव दर्जाचे अधिकारी याची चौकशी करतील असे मंत्री जारकीहोळी यांनी सांगितले.

हिरेकोडी जैन मुनींच्या हत्येचे प्रकरण संपले आहे. पोलिसांनी तातडीने तपास करून आरोपीना अटक केली आहे. आता पुन्हा काय तपास करणार असा प्रतिसवाल त्यांनी याबाबतच्या प्रश्नावर केला. राज्यातील 28 राज्य महामार्ग राष्ट्रीय महामार्गांमध्ये सुधारित करण्यात येणार आहेत. याबाबत केंद्रीय रस्ता वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी बोलणे झाल्याचे मंत्री जारकीहोळी यांनी सांगितले. बेळगावातील बीम्स रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या कमतरतेवर मात करण्यावर भर दिला जात आहे असे ते म्हणाले. खानापूर-गोवा राष्ट्रीय महामार्गावर टोलवसुलीला जनतेकडून विरोध होत आहे. राज्यात पावसाची कमतरता आहे. पाऊस न पडणाऱ्या जिल्ह्यांना दुष्काळी जाहीर करण्यात येईल, 15 जुलैपर्यंत पावसाचे प्रमाण पाहून हा निर्णय घेण्यात येईल असे खुद्द सीएम सिद्धरामय्या यांनी सांगितले आहे असे ते म्हणाले. सरकार लवकरच दुष्काळग्रस्त जिल्ह्यांची घोषणा करणार आहे.

लोकसभा निवडणुकीबाबतच्या प्रश्नावर बोलताना, यासंदर्भात आमची बंगळुर येथे बैठक झाली आहे. येत्या दोन महिन्यांत काँग्रेसच्या उमेदवाराचे नाव जाहीर केले जाईल. बेळगाव आणि चिक्कोडीच्या उमेदवाराचे नाव जाहीर

लोकसभेच्या तिकीटासाठी इच्छुकांची यादी मोठी आहे. स्थानिक आमदार आणि नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. आवश्यक असेल तरच आमच्या कुटुंबातील कोणी निवडणूक लढवेल. आत्ताच्या परिस्थितीत आमचे कुटुंब दुसऱ्या क्रमांकावर आहे. म्हणाले की, लोकसभा लढवा असे पक्षाने सांगितले तर मी उभा राहीन मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.

सिद्धरामय्या यांचा मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ केवळ अडीच वर्षांचा आहे का? या प्रश्नावर
मला मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळाबद्दल काहीही माहिती नाही असे सांगत थेट उत्तर देण्याचे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले

Tags: