Belagavi

काकती सरकारी शाळेत बॅगलेस डे उपक्रम उत्साहात

Share

बेळगाव आहार व शालेय शिक्षण विभागाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ‘बॅग फ्री डे आणि सेलिब्रेशन शनिवार’ जिल्हाभरात शनिवार दि. 15 रोजी यशस्वीपणे पार पडला. बेळगाव तालुक्यातील काकती येथील शासकीय प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये बॅगलेस दिवस आज खास पद्धतीने साजरा करण्यात आला.

संबंधित वर्गातील मुलांसाठी कथा सांगणे, कविता पाठ करणे, अक्षरे मांडणे, विविध साहित्य वापरून आकार तयार करणे, विशेष योगाचे विविध आयाम सांगणे, ध्यानधारणा, एकाग्रता वाढवणे असे विविध प्रकारचे उपक्रम करण्यात आले. संबंधित वर्गातील विद्यार्थ्यांनी आनंदाने आणि सर्व उपक्रमांमध्ये सहभाग घेऊन बॅगलेस डे साजरा केला.


याप्रसंगी बेळगाव जिल्हा एकात्मिक शिक्षण अभियानाचे प्रकल्प संचालक बी एच मिल्यानट्टी यांनी शाळेला भेट देऊन मुलांचा प्रत्येक उपक्रम आवडीने पाहिला व त्यांना योग्य तो सल्ला दिला व त्यांना प्रोत्साहन दिले. संपूर्ण आठवडा दप्तर घेऊन फिरणाऱ्या आणि या दिवशी दप्तर न घेता केवळ अभ्यासक्रम शिकणाऱ्या मुलांची विशेष आवड निर्माण करून मुलांच्या योग्य कलागुणांना बाहेर आणण्यासाठी हे व्यासपीठ आहे. त्याचप्रमाणे हा कार्यक्रम मुलांच्या नैतिक मूल्यांच्या वाढीसाठी एक नमुना आहे असे त्यांनी सांगितले. फ्लो
बेळगाव ग्रामीण विभागाचे क्षेत्र समन्वयक महादेव मेदार यांनी ‘आनंदी शनिवार’ या उपक्रमाच्या अंमलबजावणीची पाहणी करून शिकण्याची प्रक्रिया सुधारण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे सांगितले. याच प्रसंगी हायस्कूलच्या शिक्षिका ललिता महाजन शेट्टी शशिकला होसूर, गीता खानट्टी यांनी विषयनिहाय वार्षिक मार्गदर्शक सूचनांबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक बी एन मडीवाळर, ए एस कराळे, एस वाय मरकुंबी यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते. शिक्षक महेश अक्की यांनी स्वागत केले. हायस्कूलच्या प्रभारी मुख्याध्यापिका सुमित्रा करविनकोप्प यांनी शाळेची माहिती दिली. शिक्षक शिवानंद तल्लुर यांनी त्यांच्या वर्गातील मुलांचा सहभाग अधिका-यांना दाखवला.

Tags: