महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमा अंतर्गत हंगरगे येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळेमध्ये महाराष्ट्र एकीकरण युवा समिती कडून शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
प्रति वर्षी मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने पहिल्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच इतर गरजू विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येते त्या अंतर्गत आज हंगरगे येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळेमध्ये साहित्याचे वाटप करण्यात आले.

युवा समिती सरचिटणीस श्री. श्रीकांत कदम यांनी युवा समिती च्या शैक्षणिक उपक्रमाची माहिती दिली. यावेळी मुख्याध्यापक श्री. चौगुले यांनी सूत्रसंचालन केले.
सदर कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक लेशकर व
इतर शिक्षकवर्ग तसेच महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने अध्यक्ष अंकुश केसरकर, अशोक पाटील, श्रीधर सांगावकर, स्वप्नील पाटील, सहिल पाटील, संतोष पाटील, आनंद पाटील, प्रतिक पाटील हे उपस्थित होते.


Recent Comments