Belagavi

बेळगावच्या प्रादेशिक आयुक्तपदी एस. बी. शेट्टन्नावर रुजू

Share

बेळगावच्या प्रादेशिक आयुक्तपदी ज्येष्ठ आयएएस अधिकारी एस. बी. शेट्टन्नावर आज रुजू झाले.

मूळचे बेळगावचेच असलेले संजीव शेट्टन्नावर यांची राज्य सरकारने बेळगावचे प्रादेशिक आयुक्तपदी बदली केली आहे. आज त्यांनी प्रादेशिक आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी अतिरिक्त प्रादेशिक आयुक्त एस एस बिरादार यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. बेळगावच्या प्रादेशिक आयुक्तपदी रुजू होण्यापूर्वी ते हट्टी गोल्ड माईन्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक होते.

यापूर्वी त्यांनी हावेरी आणि विजापूरचे जिल्हाधिकारी म्हणूनही काम केले आहे. एम जी हिरेमठ प्रादेशिक आयुक्त पदावरून निवृत्त झाल्यावर जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्याकडे या पदाचा कार्यभार सरकारने सोपवला होता.

आता या पदी संजीव शेट्टन्नावर यांची बदलीवर नियुक्ती करण्यात आली आहे. बेळगावचे माजी अतिरिक्त पोलीस अधीक्षक दिवंगत बी एन शेट्टन्नावर यांचे ते पुत्र आहेत.

Tags: