घटप्रभा डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी , हुक्केरी गोकाक राज्यमार्ग रोखून धरून , घटप्रभा शहरात शेतकऱ्यांनी आंदोलन केले .


मान्सूनचा पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची कामे केली नाहीत, पिण्याच्या पाण्याअभावी तसेच गुरांना चारा व पिण्याचे पाणी नसल्याने रायबाग, जमखंडी, मुधोळ , मलिंगपूर परिसरातील शेतकऱ्यांनी मृत्युंजय सर्कलजवळ राज्य महामार्ग रोखून धरला आहे. हिडकल जलाशयातून डाव्या कालव्यात पाणी सोडण्याची मागणी यावेळी करण्यात आली .
त्यानंतर पाटबंधारे विभागाचे अधिकारी व पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी आंदोलकांची समजूत घातली व रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला.


Recent Comments