चिक्कोडी तालुक्यातील हिरेकोडी गावातील नंदी पर्वत आश्रमाचे जैन मुनी श्री 108 कामकुमार नंदी महाराज यांच्या निर्घृण हत्येचा निषेध करण्यासाठी व त्यांच्या आत्म्याला चिरशांती मिळावी यासाठी चिक्कोडी तालुक्यातील मांजरी गावातील एकता सोशल फाउंडेशनच्या वतीने बस स्टँड जवळ जैन मुनींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. .

यावेळी श्री 108 कमकुमार नंदी महाराजांच्या प्रतिमेस डॉ. विजय उपाध्याय आणि डॉ. रमेश खिचडे पूजन करून रमेश नमोकार मंत्राचा जप करण्यात आला. डॉ.विजय उपाध्याय म्हणाले की, जैन धर्म हा जगाला अहिंसेचा संदेश देणारा पवित्र धर्म आहे. या धर्मातील मुनींच्या हत्येने संपूर्ण मानवजातीला हादरवले आहे . अखंड हिंदू दक्षता याचा तीव्र निषेध करते. साधू-संतांची हत्या ही गंभीर बाब आहे. यासाठी सर्व हिंदू संघटना आणि हिंदू नागरिकांनी आता तरी जागे होण्याची गरज आहे. मुनी महाराजांच्या मारेकऱ्यांना सरकारने कठोर शिक्षा करावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी एकता सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष दिलीप पवार, सुरेश मंगळेकर, संजय नांद्रे, दीपक टोणपे , श्रीधर भोजकर, शशिकांत पाटोळे, अमर यादव, चांदूर गावचे महावीर मंगसुळे, सुनील खिचडे, सनी पाटील, चंद्रसेन कदम, फारूक तांबोळी, सचिन माने, पोपट पाटील आदी उपस्थित होते. भोजकर आदींसह एकता फाऊंडेशनचे सर्व कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments