Belagavi

हिंदवाडीत मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न

Share

बेळगावच्या सीमावर्ती भागात बालकांना पळवून नेणारी टोळी सक्रिय आहे यामुळे नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे .
बेळगावमधील हिंदवाडी पोस्ट ऑफिसजवळ मंगळवारी सायंकाळी नऊ वर्षीय मुलीच्या अपहरणाचा अयशस्वी प्रयत्न झाला.

एका व्यक्तीने शिकवणीसाठी जाणाऱ्या मुलीला चॉकलेट देऊन आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला.
मात्र या प्रकरणात मुलीने त्याच्यापासून दूर जाण्यासाठी धडपड केली. तिने अपहरणकर्त्याने तिला खांद्यावर उचलून घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला यावेळी त्या मुलीने , आरडाओरडाही केला. तिथून ये जा करणार्यांनी ते पहिले . मात्र मुलीने अधिक आरडाओरडा केल्याने त्यांना संशय आला . शेवटी त्याला पकडण्यासाठी जेव्हा लोकांनी पाठलाग केला. तो तिला सोडून पळून गेला अशी माहिती आहे.

याबाबत मुलीच्या आईने टिळकवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असता अपहरणकर्त्या मुलीला उचलून पळून गेल्याचे सीसीटीव्ही फुटेज आढळून आले.
यासंबंधी इथल्या नागरिकांनी असा अपहरणाचा प्रकारात आमच्या इथे प्रथमच घडला आहे . हिंदवाडी येथील महावीर गार्डन येथे पाचवी इयत्तेत शिकणाऱ्या मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला . नागरिकांच्या प्रसंगावधानाने मोठा प्रसंग टाळला . पोलिसांनी लवकरात लवकर या इसमाचा शोध घ्यावा अशी विनंती त्यांनी पोलीस प्रशासनाला केली .

बेळगाव शहरात अशी घटना घडल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. शहरातील एका खासगी शाळेत काम करणाऱ्या व्यक्तीने ग्रामीण भागातील मुलीशी गैरवर्तन केल्याची घटनाही समोर आली आहे.

Tags: