Belagavi

ग्रामस्थांच्या खुनाच्या तक्रारीवरून , पोलिसांनी पुरलेला मृतदेह बाहेर काढून केला पंचनामा

Share

तरुणाच्या डोक्यावर काठीने वार करून त्याचा खून करून , घराच्या मागे अंत्यसंसकार करण्यात आले होते . मात्र ग्रामस्थांनी केलेल्या खुनाच्या तक्रारीनंतर पोलिसानी पुरलेला मृतदेह बाहेर काढून पंचनामा करून आरोपीना अटक केली .

गोकाक तालुक्यातील हिडकल गावात ही घटना घडली आहे . सोमय्या महालिंगय्या हिरेमठ (वय २४ ) याला दारूचे व्यसन होते . त्यामुळे तो पैशासाठी घरच्यांना त्रास देत असे . याला कंटाळून मृत सोमय्याचे वडील महालिंगय्या गुरुसिद्धया हिरेमठ आणि भाऊ बसय्या हिरेमठ (वय २६) या दोघांनी सोमय्याच्या डोक्यात काठीने प्रहार करून त्याचा खून करून घराच्या पाठीमागील जागेत त्याच्यावर अंत्यसंस्कार केले .

मृतदेहावर जखमा असल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला, आणि पोलिसांनी सोमय्याला पुरलेल्या जागेतून त्याच्या मृतदेहाच्या सांगाड्याचे अवशेष बाहेर काढून पुढील तपासणी केली .
या प्रकरणी आरोपी महालिंगय्या गुरुसिद्धय हिरेमठ, बसय्या हिरेमठ याना अटक करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत .

Tags: