वडगावची ग्रामदैवता श्री मंगाई देवी जत्रा अगदी उत्साहात प्रारंभ झाली आहे यात्रेनिमित्त वडगाव नगरी सज्ज झालेली आहे. अबाल वृध्द महिला वर्ग यांच्यात उत्साह दिसून येत आहे.लांबलेल्या पावसाने दमदार सुरुवात केल्याने शेतकरी वर्ग काहीसा सुखावला आहे.
मंगाई यात्रा म्हटले की प्रामुख्याने या यात्रेचे हकदार चव्हाण पाटील आहेत हे साऱ्यांना माहित आहे ,यावर्षी यात्रा सुरळीत पार पडावी या दृष्टिकोनातून बेळगावच्या प्रथम नागरिक महापौर शोभा सोमानाचे सह , नगरसेविका सारिका पाटील, मंगेश पवार, जयंत जाधव, रेश्मा खामकर, गिरीश धोंगडी, राजू भातकांडे, दिपाली टोपगी, आनंद चव्हाण, या साऱ्यांनी मिळून मंगाई देवस्थान परिसरात चाललेले साफसफाई कामकाज व इतर व्यवस्थेबद्दल पाहणी केली , यावेळी महापौर शोभा सोमानाचे यांनी यात्रेची पूर्वतयारी संपूर्ण झाली असून येणाऱ्या भाविकांनी स्वतःची काळजी घेऊन मंगाई देवीचे दर्शन घेण्याचे आवाहन केले,
तर या मंदिरचे हकदार चव्हाण पाटील यांनी मंगळवारी 10 नंतर गाऱ्हाणे उतरण्यासाठी सर्व भाविकांनी वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन केल्याप्रमाणे बाराच्या सुमारास गाराने उतरल्यानंतर हकदार चव्हाण पाटील यांच्या हस्ते या मंगाई देवीची आरती व पूजाअर्चा झाल्यानंतर नारळ वाढवणे सह मानपान कार्यक्रमाला सुरुवात झाली . यावेळी मंगाई यात्रेसंदर्भात गौरव पाटील यांनी माहिती दिली
व्यतिरिक ्त भक्तांनी रांगेत उभे राहून देवीचे दर्शन घेतले . मंगाई परिसरात यात्रेला गालबोट लागू नये या दृष्टिकोनातून पोलीस बंदोबस्त ही ठेवण्यात आला होता दुपारी बारा वाजल्यापासून सायंकाळपर्यंत अफाट गर्दी पाहायला मिळाली

दरवर्षी येणारी खेळणी विविध वस्तूंची दुकाने त्याचं बरोबर स्थानिक व्यापाऱ्यांनी थाटलेली दुकाने यामुळे जत्रेच माहोल तयार झालेला आहे. लहान मुले उभारण्यात येणाऱ्या पाळणे, झुले इतर खेळ यांच्या शेजारी कोंडाळे करून निरीक्षणात गुंतली आहेत. जत्रेसाठी आणलेले ठगर, मेंढे बकरी आणि कोंबड्यांच्या आवाजाने परिसर गजबजून गेला आहे .
सासुर वासिनी माहेरला परत आलेल्या आहेत लांबलेल्या पावसाने दमदार सुरुवात केल्याने शेतकरी वर्ग काहीसा सुखावला आहे . मंगाई जत्रेसाठी आलेल्या स्वाती कोलकर , रोहित कारेकर आदी भाविकांनी या माहिती दिली .
वडगावचे श्री मंगाई देवस्थान जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे.बेळगाव परिसरातील भाविक किंवा भाविक वर्षभर यात्रेची वाट पाहत असतात. देवीच्या मंदिराच्या आवाराला आता चारही बाजूंनी कुंपण घालण्यात आले आहे, त्यामुळे जत्रा सुव्यवस्थितपणे पार पडण्यास मदत होईल, याशिवाय भाविकांच्या सोयीसाठी रेलिंग टाकण्याचे कामही सुरू आहे. मंदिर क्षेत्र.श्रावण महिन्याच्या पूर्वसंध्येला मांसाहारी आहाराची ही यात्रा बेळगावात मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे.
या दिवसांत बहुतांश बेळगावकर वडगावकरांचा पाहुणचार अनुभवतात मुख्य दोन दिवस चालणारी ही जत्रा पुढेही सात दिवस सुरूच असते. जत्रा यात्रांच्या निमित्ताने गावगड्यात आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात होत असल्याने व्यापारी वर्गही या दिवसांत लगबगीत असतो. मुख्य यात्रेच्या दिवशी दुकाने, हॉटेल, फिरते व्यापारी जवळ जवळ रात्रभर जत्रेत दंग असतात अशी ही निसर्गाच्या सृजनतेच्या पूर्वसंध्येला येणारी जत्रा लोकप्रिय तर आहेच त्याचबरोबर मंगाई देवीच्या श्रद्धास्थानाचे महात्म्य टिकून आहे.


Recent Comments