चिकोडीतील हिरेकोडी येथील जैन स्वामींच्या हत्येचा निषेध करण्यासाठी विश्व हिंदू परिषद , बजरंग दलाच्या वतीने , विविध स्वामीजींच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा काढून , हत्येतील आरोपीना कठोर शिक्षा करण्याच्या मागणीचे निवेदन शासनाला देण्यात आले .
व्हॉईस ओव्हर : तेजा प्रति भीमपीठाचे हरिगुरु महाराज, केदारपीठाच्या मुत्नाळ शाखेतील शिवानंद शिवाचार्य स्वामीजी
विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष कृष्णा भट्ट यांच्या नेतृत्वाखाली शहरातील कन्नड साहित्य भवनापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यत मोर्चा काढण्यात आला . ५ जुलै रोजी जैन मुनींची अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली होती . पोलिसांनी या हत्येतील एका मारेकऱ्यांचा नाव लवकर जाहीर केले नव्हते . सर्वसंगपरित्याग केलेल्या आणि अहिंसावादी जैन मुनींच्या हत्येचा सखोल तपास करावा आणि आरोपीना कठोर शिक्षा द्यावी या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला . यामध्ये हजारोंच्या संख्येने जैन बांधव आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते .
चन्नमा सर्कलमार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला . त्या ठिकाणी आपल्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला पाठवण्यात आले .
Recent Comments