Athani

जैन मुनींच्या आरोपीना चिकोडी पोलिसांनी हिंडलगा कारागृहातून घेतले ताब्यात

Share

हिरेकोडी जैनमुनी कामकुमार नंदी महाराज खून प्रकरणातील दोन आरोपीना चिक्कोडीचे डीवायएसपी बसवराज यलीगार सीपीआय आरआर पाटील यांच्या पथकाने हिंडलगा कारागृहातून ताब्यात घेतले . चिकोडी तालुका रुग्णालयात सदर आरोपींची आरोग्य तपासणी करून , त्यांना न्यायालयासमोर हजर करून , अधिक चौकशीसाठी आरोपींची १४ दिवसांची पोलीस कोठडी मागणार आहेत .

संपूर्ण राज्यच नाही तर देशाला हादरवून टाकलेल्या , चिकोडी तालुक्यातील , जैन मुनी कामकुमार नंदी महाराजांच्या ५ जुलै रोजी झालेल्या हत्येची अधिक चौकशी करण्यात येत आहे . यासाठी मंगळवारी सकाळी चिक्कोडीचे डीवायएसपी बसवराज यलीगार सीपीआय आरआर पाटील यांना पथकाने बेळगावच्या हिंडलगा कारागृहातुन नारायण माळी आणि हसन दलायत या दोघं आरोपीना ताब्यात घेतले .


पोलीस आरोपींना चिक्कोडी जेएमएफसी कोर्टात हजर करणार आहेत पोलीस 14 दिवसांची पोलीस कोठडी मागणार आहेत. दोन सीपीआय, एका डी आर पथकाच्या सुरक्षेत आरोपीना चिक्कोडीला रवाना करण्यात आले . हिंडलगा कारागृहातून त्यांना आरोग्य तपासणीसाठी चिक्कोडी तालुका रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर पोलीस चिक्कोडी न्यायालयात हजर करणार आहेत. हत्या प्रकरणाच्या अधिक चौकशीसाठी पोलिस, आरोपींची चौदा दिवसांची पोलिस कोठडी मागणार आहेत.

Tags: