Belagavi

जैन मुनींच्या हत्येचा सीबीआयकडे सोपवा : माजी आमदार महांतेश कवटगीमठ यांची मागणी

Share

हिरेकोडी नंदीपर्वत आश्रमाचे कामकुमारनंदी महाराज यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवावा, अशी मागणी माजी आमदार महांतेश कवटगीमठ यांनी केली आहे.

सोमवारी चिक्कोडी येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना ते म्हणाले की, जैन समाजानेच भारताला अहिंसा परमोधर्माचा संदेश दिला. जैन समाजाचे सुपुत्र नंदी महाराज यांच्या हत्येचा भाजप तीव्र निषेध करते. आज भाजपनेही मूक आंदोलनात सहभाग घेतला. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी चिक्कोडी भाजपची मागणी आहे. तसेच हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची मागणीही त्यांनी केली.

चिक्कोडी जिल्हा भाजप अध्यक्ष राजेश नेर्ली, जिल्हा सरचिटणीस सतीश अप्पाजीगोळ , चिदानंद कोरे साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष भरतेश बाणवणे आदी उपस्थित होते.

Tags: