सततच्या कामाच्या दडपणात पत्रकारांना आरोग्याकडे लक्ष देता येत नाही. महापालिकेच्या महापौर शोभा सोमनाचे यांनी पत्रकार कल्याण निधीतून महापालिकेने आरोग्य विमा उपलब्ध करून देण्याची मागणी केली, त्याचा चांगला उपयोग झाला आहे.
सोमवारी त्यांनी महापालिकेच्या कौन्सिल हॉलमध्ये पत्रकारांना आरोग्य विमा कार्डचे वाटप करण्यात आले . कामाच्या दडपणाखाली पत्रकार आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत. तसेच ते आपल्या कुटुंबाकडे लक्ष देत नाही. या संदर्भात महापालिकेच्या पत्रकार कल्याण निधीतुन पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांना लागू पडेल तसा आरोग्य विमा उपलब्ध करून दिला आहे. याचा लाभ घेऊन निरोगी राहण्याचे आवाहन महापौर शोभा सोमनाचे यांनी केले
यावेळी आयुक्त अशोक दुडगुंटी , उपमहापौर रेश्मा पाटील आणि नगरसेवक आदी उपस्थित होते.
Recent Comments