Belagavi

आ . आसिफ सेठ यांनी कोनवाळ गल्लीच्या नागरिकांशी समस्यांविषयी साधला संवाद

Share

आमदार आसिफ उर्फ राजू सेठ यांनी , महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्यासोबत कोनवाळ गल्लीला भेट देऊन परिसराची पाहणी केली.
दौऱ्यात त्यांनी परिसरातील नागरिकांशी संवाद साधून रहिवाशांना भेडसावणाऱ्या समस्यांवर चर्चा केली. निवडणुकीच्या काळात दिलेली आश्वासने आता पूर्ण केली जात असून, त्यांच्या दौऱ्यात ज्या प्रश्नांवर चर्चा झाली, त्यावर लवकरच कामे केली जातील, असे आश्वासन त्यांनी रहिवाशांना दिले. आपल्या कार्यकाळात बेळगावच्या जनतेला सर्वोत्कृष्ट सुविधा मिळाव्यात याची जबाबदारी आपली असून, लवकरच नागरिकांना त्यांच्या समस्या सहज कळू शकतील आणि शहरातील विकास प्रक्रियेला प्राधान्य देण्याची व्यवस्था करणार असल्याचेही ते म्हणाले.

Tags: