बेळगाव उत्तर मतदारसंघातील अमन नगर येथे ६५० मीटर गटारीचे कामकाज आ . आसिफ सेठ यांनी सुरु केले .
येथील नागरिकांना पावसाळ्यात नादुरुस्त रस्ते व गटारींमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. गटारींमध्ये तुंबलेले पाणी रस्त्यावर आल्याने नागरिकांना विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आमदार आसिफ (राजू) सेठ यांनी सत्तेत आल्यावर हे प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन दिले होते आणि आज अमन नगरमध्ये 650 मीटर लांबीच्या गटाराचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यांनी परिसरातील विविध भागांची पाहणी करून रहिवाशांशी थोडक्यात चर्चा करून त्यांच्या तक्रारी जाणून घेतल्या. नजीकच्या काळात सर्व तक्रारींची पद्धतशीरपणे दखल घेतली जाईल, असे आश्वासन रहिवाशांना देण्यात आले.



Recent Comments