Belagavi

अमरनाथ यात्रेसाठी गेलेले बेळगावचे यात्रेकरू सुरक्षित

Share

अमरनाथ यात्रेसाठी बेळगावमधून गेलेल्या यात्रेकरूंनी आपण सुखरूप असल्याचा व्हिडीओ जारी केला आहे . बीएसएफ च्या छावणीत आपण सुरक्षित असून सरकारचा पुढील निर्देश आल्यानंतर त्यांना तिथून हलवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले .


व्हॉइस ओव्हर : अमरनाथ येथे दर्शन घेऊन परतत असताना उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे , बेळगावमधून गेलेले यात्रेकरू श्रीनगर ते जम्मू दरम्यान अडकून पडले आहेत . हे यात्रेकरू , बीएसएफच्या छावणीत सुरक्षित असून , त्यांना
बीएसएफ च्या वतीने अन्नपाण्याची पुरवण्यात येत आहे . आपण सुरक्षित आहोत आणि सरकारचा पुढील आदेश मिळेपर्यंत या ठिकाणी राहावे लागणार असल्याचे त्यांनी एका व्हिडिओद्वारे कळवले आहे . माजी आ . अनिल बेनके यांनी देखील या यात्रेकरूंची फोन करून विचारपूस केली असून त्यांनी आर्थिक मदत देखील देऊ केली आहे .

Tags: