Belagavi

पिण्याच्या पाण्याच्या समस्येंदर्भात घ्या पूर्वखबरदारी : प्रादेशिक आयुक्त नितेश पाटील यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

Share

बेळगाव प्रादेशिक आयुक्त नितेश पाटील यांनी बेळगाव विभागांतर्गत जलाशयांमध्ये पाणीसाठा व पिण्याच्या पाण्याची उपलब्धता याबाबत बैठक घेतली. बैठकीत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, आलमट्टी झोनचे मुख्य अभियंता एच.सुरेश, अधीक्षक अभियंता डी. बसवराज, कार्यकारी अभियंता मोहन हलगट्टी आदी .वरिष्ठ व कनिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग होता. कृष्णा भाग्य जल निगम, आलमट्टीच्या व्यवस्थापकीय संचालक कार्यालयात आज झालेल्या बैठकीत , जुलै 2024 अखेरपर्यंत लोकांच्या आणि पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याचा त्रास होणार नाही यासाठी तत्पर राहून, कामाचा आराखडा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Tags: