कागवाड तालुक्यातील उगार गावातील मुस्लिम समाजाच्या रहमान फाऊंडेशनच्या वतीने भारताच्या रक्षणासाठी अहोरात्र ऊन, थंडी, पाऊस यांत अखंड सेवा देणाऱ्या अभिमानी सैनिकांसाठी रक्तदान शिबिर घेतले.
रहमान फाऊंडेशनतर्फे बकरी ईदनिमित्त आयोजित रक्तदान शिबिराचे आयोजन रविवारी उगार खुर्द शहरातील अली पब्लिक स्कूलच्या सभागृहात मुस्लिम समाज बांधवांनी केले होते.
उगार मुस्लिम समाज संघटनेचे अध्यक्ष बादशाह जमादार, रहमान फाऊंडेशनचे अध्यक्ष मौलाना सय्यद यांच्या नेतृत्वाखाली रक्तदान शिबिर पार पडले.
मिरजेच्या अक्षय रक्त संकलन बँकेचे प्रमुख मेहबूब मुजावर, हुसेन मुजावर व कर्मचाऱ्यांनी रक्त संकलन केले.
शिबिरात 125 तरुणांनी रक्तदान केले.
शिबिराला संबोधित करताना रहमान फाऊंडेशनचे अध्यक्ष मौलाना सय्यद म्हणाले की, रक्तदान ही पवित्र सेवा आहे, आपल्या प्राणांची आहुती देऊन देशाचे संरक्षण जाणारा सैनिकांसाठी हे रक्तदान शिबीर घेतले जात आहे, प्रत्येकाने देशासाठी आपले योगदान दिले पाहिजे. (बाईट )
उगार नगरपालिकेचे सदस्य प्रताप जत्राटी म्हणाले की, रहमान फाऊंडेशनच्या वतीने उगार शहरात विविध सेवांच्या माध्यमातून समाजसेवेचे उपक्रम राबविले जात आहेत, आता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, शंभरहून अधिक तरुणांनी रक्तदान केले असून, त्यांनी सैनिकांसाठी रक्तदान केले आहे. ही विशेष बाब आहे, अशा रक्तदान शिबिरात प्रत्येक तरुणाने सहभागी होऊन पवित्र सेवा करावी.
शिबिर यशस्वी करण्यासाठी रहमान फाऊंडेशनचे मौलाना सय्यद, निमंत्रक अफीज सुलतान, हापीज समीर, मुफ्ती इस्माईल, रमजान मैसाले, सलीम मुल्ला, खाजा मुल्ला, नगर सोसायटीचे ज्येष्ठ आबिद जमादार, नगरसेवक हारुण मुल्ला, प्रताप जत्राटे, नौसाद मुल्ला, मेहबुब यांनी परिश्रम घेतले. शिबिरात मुजावर यांच्यासह अनेक तरुणांनी सहभाग घेतला.
Recent Comments