Belagavi

हिरेकुडीतील जैन मुनी हत्या प्रकरणाची निःपक्षपातीपणे चौकशी करण्याची मागणी

Share

चिक्कोडी तालुक्यातील हिरेकोडी गावातील नंदी पर्वत आश्रमाचे जैन मुनी श्री 108 कामकुमार नंदी महाराज यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री तथा आमदार शशिकला जोल्ले यांनी आज पहाटे आश्रमाला भेट देऊन भाविकांना विश्वासात घेतले. नंतर आमदार शशिकला जोल्ले म्हणाल्या की, अहिंसा हाच परम धर्म असल्याचा संदेश देणाऱ्या जैन समाजातील ऋषीमुनींच्या हत्येचे क्रूर कृत्य करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. या हत्येचा मी निषेध करते . या प्रकरणाची निःपक्षपाती चौकशी झाली पाहिजे. या शोकात बुडालेल्या संपूर्ण जैन समाज बांधवांच्या दुःखात मीही सहभागी असल्याचे त्यांनी सांगितले.

Tags: