हिरेकुडी नंदीपर्वत आश्रमाचे कामकुमार नंदी महाराज यांच्या पार्थिवाचे बेळगाव येथील बीम्स रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले . त्यानंतर मृतदेह व्यवस्थापन मंडळाच्या सदस्यांच्या ताब्यात देण्यात आला . हिरेकोडी नंदीपर्वत आश्रमाचे कामकुमार नंदी महाराज यांची आर्थिक व्यवहारातून निर्घृण हत्या करण्यात आली होती . त्यानंतर मारेकऱ्यांनी त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करून , कूपनलिकेत टाकले होते . एस पी संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली , चिकोडी पोलिसांनी तपास करून , ३० फूट खोल कूपनलिकेतून मुनी महाराजांच्या मृतदेहाचे ९ तुकडे बाहेर काढून , बेळगावच्या बीम्स हॉस्पिटलमध्ये शवचिकित्सेसाठी पाठवले होते .
रविवारी सकाळी , शवचिकित्सा झाल्यानंतर मृतदेह व्यवस्थापन मंडळाच्या सदस्यांच्या ताब्यात देण्यात आला. हुक्केरीचे आ . गणेश हुक्केरी आणि प्रकाश हुक्केरी यांनी बीम्सच्या शवागाराला भेट दिली आणि पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले आणि श्रद्धांजली वाहिली . यावेळी त्यांनी मुनी महाराजांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले. दोन सीपीआयच्या बंदोबस्तात मृतदेह बेळगाव येथून हिरेकोडी येथे नेण्यात आला.
Recent Comments