अथणी आणि कागवड तालुक्यातील जैन समाजाच्या नेत्यांनी ऐनापूर येथे बैठक घेऊन आचार्य कुंटुसागर मुनी महाराजांचे परम शिष्य कामकुमार नंदी मुनीजी यांची हत्या करणाऱ्यांना फाशी देण्याची मागणी केली.
शनिवारी कागवाड व अथणी तालुक्यातील जैन समाजाचे नेते ऐनापूर येथील जैन समाज भवनात एकत्र जमले होते . कर्नाटक राज्य जैन संघटनेचे संयोजक ए.सी.पाटील यांनी सांगितले की, कामकुमार नंदी महाराज यांचे अपहरण करून त्यांची दोन नराधमांनी हत्या केली होती.
निष्कलंक स्वामीजींची हत्या हे महापाप आहे.राज्य सरकारने याचा गांभीर्याने विचार करून या दोघांना अटक करून योग्य तो कायदा करून सर्व जैन साधूंना पोलीस संरक्षण उपलब्ध करून देण्याचा मुद्दा उचलून धरावा,अशी विनंती ए.सी.पाटील यांनी सरकारला केली आहे.
बेळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध वकील संजय कुचनुरे यांनी सांगितले की, जैन समाजाचे कामकुमार स्वामीजींच्या यांच्या हत्येची ही बाब समजल्यानंतर धक्काच बसला आहे.कागवडा व अथणी तालुक्यातील जैन समाज या निरपराधांच्या हत्येचा निषेध करतो.
उगार पद्मावती मंदिराचे प्रमुख शीतल गौडा पाटील यांनी श्रद्धांजली सभेत बोलताना आचार्य काम कुमार स्वामीजींच्या मारेकऱ्यांचा निषेध केला . , हा जैन समाजातील साधूंवर मोठा अन्याय आहे, त्यांनी हे प्रकरण उचलून धरण्याची इच्छा व्यक्त केली.जैन समाजाचे जेष्ठ प्रमुख , निवृत्त अभियंता अरुण यलगुद्री यांनी आपल्या भाषणातून, जैन मुनींना श्रद्धांजली वाहिली . KRES शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष दादागौडा पाटील, सुनील पाटील, राजू नंदेश्वर, उदय निडगुंदी , प्रमोद लिंबिकाई, यशवंत पाटील, प्रकाश चिनगी यांच्यासह समाजाचे अनेक नेते उपस्थित होते.
Recent Comments