Dharwad

सदोष मोबाईल पुरवल्याप्रकरणी एसीस कंपनीला 78 हजार रुपये दंड

Share

सदोष मोबाईल पुरवणाऱ्या कंपनीला कोर्टाचा दणका दिला आहे. एसीस कंपनी, सर्व्हिस सेंटरला 78 हजार रुपये दंड ठोठावल्याचा आदेश धारवाड जिल्हा ग्राहक आयोगाने बजावला आहे.
सारस्वतपूर, धारवाड येथील रहिवासी असलेल्या चेतन चिक्कमठ नावाच्या विद्यार्थ्याने 05 जून 2021 रोजी आपल्या अभ्यासासाठी 57,999 रुपये भरून एसीस कंपनीकडून Asis Rag-5 मोबाईल खरेदी केला होता. यामध्ये चांगली सुविधा असल्याचे सांगितले होते. मोबाईल खरेदी केल्यानंतर 6 महिन्यांतच तो खराब होऊ लागला आणि नीट काम करत नव्हता.

त्यासाठी तक्रारदाराने मोबाईल फोन तपासणी व दुरुस्तीसाठी अनेकवेळा विद्यानगर, हुबळी येथील एसीस कंपनीच्या अधिकृत सेवा केंद्राला दिला होता. त्यांनी तो मोबाईल तपासला आणि त्याचा मदर बोर्ड बदलला. पण काही दिवसातच मोबाईलमध्ये पुन्हा त्रुटी दिसून आली. त्यामुळे या एसीस कंपनीच्या निर्मात्याने आपल्याला सदोष मोबाईल पुरवला व सर्व्हिस सेंटरने योग्य सेवा न देऊन आपली फसवणूक केल्याची फिर्याद चेतनने केली होती. त्याने धारवाड जिल्हा ग्राहक आयोगाकडे तक्रार करून दोघांवरही ग्राहक संरक्षण कायद्यान्वये योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली होती. या तक्रारीची दखल घेऊन सुनावणी करून धारवाड जिल्हा ग्राहक आयोगाने कंपनी व सर्व्हिस सेंटरला 78 हजार रुपये दंड ठोठावला.

Tags: