Belagavi

बेळगाव उत्तरमध्ये आणखी कचरागाड्यांची मागणी

Share

सदाशिवनगर भागात पुरेशा कचरागाड्यांअभावी सफाई कामगारांसह रहिवाशांचीही गैरसोय होत आहे. नादुरुस्त, अपुऱ्या टिप्परमुळे कचरा उचलीची समस्या निर्माण होत आहे.

महानगरपालिकेकडून कचरा गोळा करण्यासाठी 2-3 टिप्पर गाड्या उपलब्ध केल्या आहेत. मात्र या   टिप्पर गाड्या वारंवार बंद पडत आहेत. त्यांची कायम दुरुस्ती केली जात आहे. कचरा गोळा करून लोड करून टिप्पर गाडी फुल भरून नेली जाते. पण कायम रस्त्यामध्येच बंद पडते.

सदाशिव नगर, नेहरू नगर, आझम नगर, वैभव नगर, शाहू नगर या भागातून कचरा गोळा करण्यासाठी फक्त 2-3 टिप्पर आहेत. कचरा जास्त असल्यामुळे आणखी नवीन 4 टिप्पर गाड्या उपलब्ध करून देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले व इतरांनी केली आहे.

तसेच सफाई कामगार वाढवण्याचीही गरज आहे. तीन वार्डना मिळून फक्त 30 कामगार असल्याने कामांचा त्रास होत आहे. त्यामुळे महापालिकेने नवीन टिप्पर गाड्या उपलब्ध करून देण्याची आणि नवीन कामगारांना भरती करण्याची मागणी केली जात आहे.

Tags: