वडगाव येथील ग्रामदेवता श्री. मंगाई यात्रेनिमित्त वडगाव व मंदिर परिसरात विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी मंगाई नगरमधील रहिवाशी संघटनेने महानगर पालिकेकडे केली आहे.सालाबादप्रमाणे यावर्षीपण मंगळवार दिनांक 11/07/2023 रोजी श्री. मंगाईदेवी यात्रा सुरु होत आहे. श्री मंगाईनगर मधील नागरिकांना गाऱ्हाणे उतरतेवेळी दीड नमस्कार व लोटांगण घालणेस, मंगाई मंदिराकडे सर्व भक्ताना जाण्या येण्यासाठी मार्ग नाही तसेच जर मंदिराकडे जायचे असेल तर 1 1/2 किलो मिटर म्हणजे धामणे रोड, ब्रम्हलिंग नगर, विष्णु गल्ली, मंगाई गल्ली या सर्व गल्ल्या पार करून जावे लागते.
या मार्गावर वडगाव परिसरातील सर्व महानगरपालिकेचा कचरा डेपो आहे व त्याच रोडवर कचरावाहू गाड्या, ट्रॅक्टर थांबतात. तसेच शाळेला जा-ये करणाऱ्या लहान मुलांना तेथुन जावे लागते तसेच इतर नागरिकांना पण तेथुनच जावे लागते. या रोडवरती कचरा गाड्या असल्यामुळे मुलांना व नागरिकांना आरोग्याला धोका आहे. व जत्रेला येणाऱ्या पाहुण्यांना, भाविकांना धोका आहे. मंगाई नगरच्या मेन रोडवरच्या आजुबाजुला जे खड्डे खोदले आहेत व लाईटची काही दुरुस्ती असेल, व पाण्याची टंचाईसुध्दा आहे तीसुध्दा ते दोन दिवसाच्या आत ते पुर्ण कराव्यात अशी मागणी मंगाई नगरमधील रहिवाशी संघटनेने केली आहे.
Recent Comments