Belagavi

बसवराज कट्टीमनी यांचे साहित्य समाजासाठी दीपस्तंभ : महांतेश कवटगीमठ

Share

बसवराज कट्टीमनी यांनी आपल्या साहित्यातून समाजाच्या उद्धारासाठी अथक परिश्रम घेतले. त्यांचे साहित्य हे समाजासाठी आदर्श आणि दीपस्तंभ आहे असे केएलई संस्थेचे संचालक महांतेश कवटगीमठ यांनी सांगितले. कर्नाटक सरकारचे बसवराज कट्टीमनी फौंडेशन आणि केएलई संस्थेच्या लिंगराज महाविद्यालयाच्या कन्नड विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बसवराज कट्टीमनी यांच्या तीन कलाकृतींचे प्रकाशन आणि विद्यार्थ्यांशी संवाद कार्यक्रमाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.


ज्येष्ठ साहित्यिक प्रा. सिद्धलिंग पट्टणशेट्टी, केंद्रीय साहित्य अकादमीचे सदस्य डॉ. बसवराज सादर, ज्येष्ठ लेखक चंद्रशेखर अक्की, प्रसिद्ध कथा व कादंबरीकार डॉ. बाळासाहेब लोकापुरे यांनी बसवराज कट्टीमनी यांच्या साहित्यावर विचार मांडले. बसवराज कट्टीमणी यांच्या “ज्वालामुखी मेले” या कादंबरीच्या हिंदी अनुवादासाठी प्रतिष्ठित केंद्रीय साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक धरणेंद्र कुराकुरी यांचा बसवराज कट्टीमनी फाउंडेशनतर्फे सत्कार करण्यात आला.

Tags: