Belagavi

यशाला शॉर्टकट नसतो, खडतर परिश्रम घेऊन यश मिळवा : निवृत्त कर्नल दीपक गुरांग

Share

यशाला शॉर्टकट नसतो, त्यामुळे खडतर परिश्रम घेऊन यशाला गवसणी घाला असे आवाहन निवृत्त कर्नल दीपक गुरांग यांनी केले.बेळगावात केएलएस संस्थेच्या गोगटे कॉमर्स कॉलेजमध्ये दोन दिवसीय “अन्वय-2023” सांस्कृतिक महोत्सवाचा उदघाटन सोहळा शनिवारी जल्लोषात पार पडला. त्याचे उदघाटन करून बोलताना निवृत्त कर्नल दीपक गुरांग म्हणाले की, विध्यार्थीदशा ही आपल्या भावी जीवनाचा मजबूत पाय घालण्याचा काळ आहे. या काळातच तुम्ही कठोर मेहनत घेऊन अभ्यासात यश मिळवले पाहिजे. जे धाडस करतात तेच जीवनात यशस्वी होतात.

स्वप्नं जरूर बघा, पण त्यांचा पाठलाग करून ती पूर्ण करा. एकदा तुम्ही आकांक्षांसह भरारी घेतली तर संपूर्ण अवकाश ही तुमची मर्यादा आहे. त्यामुळे विद्यार्थीदशेत बुलंद हौसले ठेवून उड्डाण घ्या, दिवसरात्र एक करून अभ्यास करून जीवनात यश मिळवा, नंतर तुम्हाला मागे वळून बघायची गरज भासणार नाही असा मोलाचा सल्ला कर्नल दीपक गुरांग यांनी विध्यार्थ्यांना दिला.

गोगटे कॉमर्स कॉलेजच्या के के वेणुगोपाल सभागृहात दोन दिवसीय “अन्वय-2023” सांस्कृतिक महोत्सवाचा उदघाटन सोहळा पार पडला. अध्यक्षस्थानी कॉलेज संचलन समितीचे अध्यक्ष प्राचार्य ए के तगारे होते. डॉक्टर एच एच विरापुरे यांनी स्वागत केले. डॉक्टर सविता खानापुरे यांनी परिचय करून दिला. अश्विनी नाईक यांनी “अन्वय-2023” सांस्कृतिक महोत्सवाची माहिती दिली. नमिता सचदेव यांनी सूत्रसंचालन केले. दोन दिवसांच्या या महोत्सवात विध्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या हेतूने विविध स्पर्धा, उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Tags: