वीरशैव लिंगायत समाज सर्वांना एकत्र आणणारा समाज आहे. या समाजात माझा जन्म झाला ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे असे महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.

बेंगळूरमधील रवींद्र कलाक्षेत्र येथे बुधवारी वीरशैव लिंगायत संघटना वेदिकेतर्फे मंत्री हेब्बाळकर यांच्या हृद्य सत्कार करण्यात आला. सत्कार स्वीकारून बोलताना मंत्री हेब्बाळकर म्हणाल्या की, लिंगायत समाजाला सर्वत्र शांतता हवी आहे. बसवण्णा यांचे स्वप्न पूर्ण होत आहे. या सन्मानामुळे माझी जबाबदारी वाढली असल्याचे त्यांनी सांगितले. आपला समाज इतर समाजाला मान देत आला आहे. वीरशैव लिंगायत समाज बेळगाव ग्रामीण भागात कमी आहे. मात्र, तेथील लोकांनी मला मोठ्या मताधिक्याने निवडून दिले. याला कारण म्हणजे आपल्या समाजाने दिलेली संस्कृती. आपल्या संस्कृतीने मला इतके मोठे केले आहे.

लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या की, राज्य सरकारची मंत्री या नात्याने आगामी काळात आपल्या समाजाचे चांगले नाव होईल असे काम मी करेन.
या सोहळ्यात माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर, बसवराज बोम्मई, मंत्री एम बी पाटील, शिवानंद पाटील आणि वीरशैव लिंगायत समाजाच्या नूतन आमदारांचा सत्कार करण्यात आला. या सोहळ्याला बाळेहोन्नुर येथील श्रीमद रंभापुरी जगद्गुरूंची दिव्य उपस्थिती लाभली होती.


Recent Comments