Belagavi

मगदूमसाब जमादार याना सेवानिवृत्तीनिमित्त निरोप

Share

खानापूर सार्वजनिक रुग्णालयात 37 वर्षांपासून फार्मसी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले मगदूम साब जमादार यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने त्यांना तालुका रुग्णालयाकडून निरोप देण्यात आला .

यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजीव नांद्रे यांनी मगदूम साब जमादार यांचा शाल व पुष्प देऊन सत्कार करून शुभेच्छा दिल्या.यावेळी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.नारायण, बालरोग तज्ज्ञ डॉ.पवन पुजार, डॉ.रमेश पाटील, डॉ.मंजुनाथ दलवाई, डॉ.पै, शिवानंद बुदरकट्टी, बिरप्पा पिल्लई, किरण मोरे, विठ्ठल कदम, श्रीधर तम्मनगोल, सचिन भीमनायिक आदी कर्मचारी उपस्थित होते. .

Tags: