विविधरंगी, विविध आकर्षक सजावटीचे आणि पाहताच तोंडाला पाणी सुटेल असे विविध चवींचे सुंदर, मनमोहक केक्स आणि त्याची कुतूहलाने, औत्सुक्याने माहिती घेणारे केकरसिक हे सगळे दृश्य बेळगावात आज पहायला मिळाले. निमित्त होते, केएलई ग्रॅज्युएट स्कूल ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजीच्या वार्षिक केक महोत्सवाचे.
होय, बेळगावातील केएलई संस्थेच्या डॉक्टर व्ही डी पाटील सभागृहात आज गुरुवारी केएलई ग्रॅज्युएट स्कूल ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजीच्या वार्षिक केक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या केक प्रदर्शनात 100हुन अधिक प्रकारचे विविध आकारातील, विविध सजावटी आणि फ्लेव्हर्सचे मनमोहक केक्स मांडण्यात आले होते.
केएलई काहेर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर नितीन गंगणे यांच्याहस्ते या केक्स प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. प्रदर्शनाबाबत माहिती देताना कुलगुरू डॉक्टर नितीन गंगणे म्हणाले की, दरवर्षी विध्यार्थ्यांच्या पाककला कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी केएलई ग्रॅज्युएट स्कूल ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजीच्या वतीने या केक प्रदर्शनाचे आयोजन कर्णयेत येते. यात विध्यार्थी केवळ केक बनविण्याचेच नाही तर त्याचे मार्केटिंग कसे करायचे याचेही ज्ञान घेतात. संस्थेत केवळ बेळगावचा नव्हे तर अन्य ठिकाणचे विद्यार्थीही शिक्षण घेतात. त्यांना हॉटेल मॅनेजमेंट आणि पूरक विषयांचे सर्व शिक्षण दिले जाते.
काहेर विद्यापीठाचे वित्त अधिकारी शिवकुमार जोतावर यांनी सांगितले की, या केक प्रदर्शनात शंभरहून अधिक प्रकारचे केक्स मांडण्यात आले आहेत. केक दिनाच्या निमित्ताने मांडलेल्या या प्रदर्शनात विविध आकारातील आरोग्यपूर्ण केक्स मांडण्यात आले आहेत.

केएलई ग्रॅज्युएट स्कूल ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजीचे प्राचार्य नंदकुमार यांनी सांगितले की, विध्यार्थ्यांना केक्स आणि बेकरी उत्पादनांचे प्रशिक्षण देण्यासाठी संस्थेतर्फे विविध उद्योगांच्या सहकार्याने अशा उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्यानुसार विध्यार्थ्यानी आयसिंग, विविध स्ट्रक्चर्सचे टॉपिंग केलेले विविध चवींचे केक्स बनविले आहेत. यात मधुमेही रुग्णांना खाता येईल अशा पद्धतीचे केक्सही आहेत.
केक्स बनवून प्रदर्शनात मांडलेल्या विद्यार्थ्यांनीही आपले अनुभव कथन केले. शिवांगीनी या विद्यार्थिनीने सांगितले की, शेफ सर्वान्ना, शेफ प्रसन्ना आणि शिक्षकांच्या मदतीने आम्ही बनवलेले शंभरहून अधिक प्रकारचे केक्स या प्रदर्शनात मांडले आहेत. हा एक छान अनुभव आहे.
गहना पै या विध्यार्थिनीने सांगितले की, बेंगळूरच्या रिचर्ड अँड कंपनीच्या सहकार्याने आम्हाला केक्स बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्या अनुभवाच्या आधारे बनवलेले केक्स आम्ही बनवून या प्रदर्शनात मांडले आहेत. विविध फ्लेव्हर्सचे, साईझचे, डेकोरेटिव्ह केक्स आम्ही प्रदर्शनासाठी तयार केले. हा एक चांगला अनुभव मिळाला आहे. बाईट.
प्रज्ञा भांदुर्गे या विद्यार्थिनीने सांगितले की, केक्स बनविणे हा आमच्या अभ्यासक्रमाचाच एक भाग आहे. बेळगावात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण देणाऱ्या संस्था आहेत. पण या क्षेत्रात पदवीचे शिक्षण देणारी केएलई ग्रॅज्युएट स्कूल ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजी ही एकमेव संस्था आहे. याठिकाणी विध्यार्थ्यांना हॉटेल उद्योगातील सर्व प्रकारचे शिक्षण देण्यात येते. चॉकलेट, मँगो, पिस्ता आदी सर्व प्रकारच्या चवींचे केक्स आम्ही बनवून या प्रदर्शनात मांडले आहेत. यातून आम्हाला खूप छान वाटले असे तिने सांगितले.

दरम्यान, या केक प्रदर्शनाला अनेक केकप्रेमींनी भेट देऊन पाहणी केली. काहेर विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर व्ही ए कोठीवाले, माजी कुलसचिव डॉक्टर व्ही डी पाटील, जेएनएमसीच्या प्राचार्या डॉक्टर महंतशेट्टी आदी यावेळी उपस्थित होते.


Recent Comments