Belagavi

टँकरने पाणी पुरवठा करून , सोडवली समस्या

Share

टँकरद्वारे पाणी पुरवठा करून , हुंचेनट्टी , मच्छे , पिरणवाडी येथील ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यात आली .

गेल्या आठवड्यात बेळगाव दक्षिण ग्रामीण भागातील हुंचेनट्टी , मच्छे , पिरणवाडी येथील ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्याच्या समस्येबाबत तक्रारी केल्या होत्या . या भागात निर्माण झालेल्या पिण्याच्या पाण्याच्या समस्येला , बेळगाव दक्षिणच्या , काँग्रेसच्या नेत्या प्रभावती मास्तमर्डी यांनी प्रतिसाद दिला . अधिकाऱ्यांशी या संदर्भात चर्चा करून , टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली .

Tags: