Belagavi

गुरुपौर्णिमेनिमित्त विध्यार्थ्यानी केली पालकांची पाद्यपूजा

Share

चिक्कोडी तालुक्यातील मांजरी गावातील शांतीसागर कन्नड माध्यम प्राथमिक व माध्यमिक शाळेत गुरुपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शाळकरी मुलांनी आपल्या पालकांची पाद्यपूजा करण्याचा विशेष सोहळापार पडला .

हिंदू परंपरेनुसार आषाढ महिन्यातील पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते, तसेच मांजरी गावातील शांतीसागर शाळेत गुरुपौर्णिमा विशेष साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी पालकांचे पुष्पवृष्टी करून स्वागत केले. त्यानंतर माता सरस्वती आणि शांतीसागर मुनींच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन करण्यात आले .
इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनीने प्रार्थना गीत आणि इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांच्या स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनींनी गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या पालकांची पाद्यपूजा केली .
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सनथकुमार पाटील, अशोक कोथळी, श्रीपाल खडकोळे, शीतलकुमार इंगळे उपस्थित होते.
यावेळी सनथकुमार पाटील यांनी गुरू आणि शिष्य यांच्यातील अतूट नाते सांगून विद्यार्थ्यांना सांगितले. दरम्यान, शाळेचे शिक्षिक सुनिल हजारे, विद्यार्थिनी भूमिका बंडगर, विजयालक्ष्मी बंडगर, मेघा चौगुले, साक्षी माने, स्फूर्ती माडीवाला यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
त्यानंतर मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. इयत्ता 8 वी ची विद्यार्थिनी भूमिका मगदुम हिने सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या वेळी हायस्कूलचे मुख्याध्यापक सुनिल वडगोल, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका नम्रता शेट्टी, शिक्षक सुनिला खुरपे, महांतेश गाडेगर, सुब्रवा होन्नाईक, रमेश कुमार , सुनिल हजारे, सागर शितोळे, कुमुद बसनायक, मनीषा खोत , अश्विनी जाडे, शिवाळे आदी उपस्थित होते.
शाळेतील सर्व शिक्षक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.

Tags: