Agriculture

जुलै ते सप्टेंबर चा पास वाढवून देण्याची विद्यार्थ्यांची मागणी

Share

विद्यार्थ्याच्या शाळा आणि महाविद्यालये सुरु झाली आहेत . बसने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बसपासची मुदत संपली असून , बस पासचे जुलै ते सप्टेंबर महिन्याचे नूतनीकरण करून द्यावे अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे .

बेळगाव शहरातील महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेण्यासाठी बेळगाव तालुक्यासहित अन्य तालुक्यातील मुले बसचा लांबलचक प्रवास करून येत असतात . सवलतीच्या दरात मिळणाऱ्या बस पासमुळे त्यांना प्रवास करणे अनुकूल होते . मात्र आता या विद्यार्थ्यांच्या बस पासची मुदत ३० जूनला संपली असून , ती वाढवून देण्याची मागणी हे विद्यार्थी करीत आहेत .
यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आपल्या मागणीचे निवेदन दिले . तुकाराम प्रधान या विद्यार्थ्याने , आपली मागणी संदर्भात माहिती दिली . (बाईट )
यावेळी , अनेक विद्यार्थी उपस्थित होते .

Tags: