Belagavi

बसविना गजपती गावातील विद्यार्थ्यांचे हाल

Share

बेळगाव तालुक्यातील गजपती गावात सकाळी बस न थांबवल्याने, संतप्त विद्यार्थ्यांनी आणि ग्रामस्थांनी , बस रोखून धरून आंदोलन केले . आणि गजपती गावासाठी वेगळी बस सोडावी अशी मागणी केली .
बेळगाव तालुक्यातील गजपती गावात सकाळी बस थांबवत नसल्याने , विद्यार्थ्यांना शाळा कॉलेजला जाण्यासाठी मोठी समस्या निर्माण होत आहे . सकाळी लवकर , विद्यार्थी बसची वाट पाहत उभे असतात . मात्र पुढील गावावरून , म्हणजेच मुगुलीगाळ, बीडी गावातून बेळगावला जाणाऱ्या बसेस एकतर भरून येतात , आणि त्यामुळे बसचालक इथे बस थांबवत नाहीत . याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे .


आज सकाळी देखील हाच प्रकार घडला . शाळा कॉलेजला जाणारे विद्यार्थी बसची वाट पाहत थांबले होते . मात्र अन्य गावाहून आलेल्या बसला गजापतीमध्ये थांबा दिला गेला नाही . असे सतत घडत आहे . त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी बस रोखून धरून निदर्शने केली
यासंदर्भात माहिती देताना तुकाराम प्रधान या विद्यार्थ्यांने बस अभावी विद्यार्थ्याना होत असलेलात्रास आणि त्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान याबद्दल माहिती दिली . तसेच गजपती गावासाठी वेगळी स्वतंत्र बस सोडावी अशी मागणी केली .
यावेळी , हिरेबागेवाडी पोलिसांची घटनास्थळी भेट, समजूत घालण्याचा प्रयत्न केला . मात्र ग्रामस्थांनी गजपती गावासाठी नवीन बससेवा सुरु करण्याची मागणी केली .

Tags: