बेकीनकेरे या गावात नुकत्याच , शेतजमिनीवरून झालेल्या प्राणघातक हल्ल्याची सखोल चौकशी करून , हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी या घटनेत मारहाण करण्यात आलेल्या कुटुंबीयांनी तसेच ग्रामस्थांनी केली . या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागणीचे निवेदन सादर करण्यात आले .
या अचानक 50 ते 60 जणांनी केलेल्या मारहाणीत अनेक व्यक्ती गंभीर जखमी झाल्या आहेत. . याआधीही वरील व्यक्तींवर असे मारहाणीचे प्रकार घडले आहेत. या मारहाणीत जखमी झालेल्या काही व्यक्तींना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या व्यक्तींनी आपल्या शेतजमिनींवर पेरलेले पीक देखील हल्लेखोरांनी 2 ट्रॅक्टरच्या सहाय्याने नष्ट केले असल्याची माहिती यावेळी प्रकाश नाईक यांनी दिली .
या घटनेच्या संदर्भात वरील 50 ते 60 जणांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी तक्रार नोंदवली आहे. मात्र पोलिसांकडून आणि लोकप्रतिनिधींकडून योग्य सहकार्य मिळत नसल्याची तक्रार धनंजय जाधव यांनी केली .
दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी आणि पोलिसांनी लवकरात लवकर या प्रकरणाचा तपास करावा. अशी मागणी धनंजय जाधव यांनी केली .
यावेळी मारहाण झालेल्या कुटुंबातील महिला आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
Recent Comments