कृष्णा नदीच्या पात्रातून बेकायदा वाळू वाहतूक सुरु असल्याच्या तक्रारीवरून , एसपी संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली धडक कारवाई करून २६ ट्रॅक्टर , ४ जेसीबी , २ टिप्पर जप्त करण्यात आले .
अथणीजवळ , कृष्णा नदीत अवैधरित्या वाळू उपसा होता असल्याची तक्रार आली होती . त्यामुळे , जिल्हा पोलीस अधीक्षक संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली , पोलीस निरीक्षक रवींद्र नायकोडी यांनी छापा टाकला आणि बेकायदा वाळू उपसा करणाऱ्यांवर धडक कारवाई केली . या कारवाईत २६ ट्रॅक्टर , ४ जेसीबी , २ टिप्पर जप्त करण्यात आले.
यासंबंधी माहिती देताना जिल्हा पोलीस प्रमुख संजीव पाटील यांनी सांगितले कि, अथणी पोलिसांना रात्रीच्या वेळी गस्तीवेळी , कृष्णा नदीत अवैध वाळू उपसा केला जात असल्याची माहिती मिळाली . त्यानुसार कारवाई करून , अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणारी वाहने जप्त करण्यात आली आहे . जिल्हाधिकाऱ्यांना देखील याची माहिती देण्यात आली आहे . संबंधितांवर , कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे ते म्हणाले .
डीवायएसपी श्रीपाद जलदे यांच्या नेतृत्वाखाली घालण्यात आलेल्या या धाडीत ,
Recent Comments