Belagavi

मॅक्सी कॅब मालकांचे मंत्री सतीश जारकीहोळींना निवेदन

Share

मॅक्सी कॅब मालकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्याच्या मागणीचे निवेदन उत्तर कर्नाटक मॅक्सिकॅब मालक संघटनेने शनिवारी जिल्हा प्रभारी मंत्री सतीश जारकीहोळी यांना शहर विकास प्राधिकरणाच्या कार्यालयात दिले.
मॅक्सी कॅब वाहनांसाठी , परिवहन आयुक्त गेल्या सहा महिन्यांपासून कोणत्याही मॅक्सी कॅबची नोंदणी करत नाहीत. नोंदणीचे नूतनीकरण होऊन जवळपास नऊ महिने झाले असून वाहनधारकांचे हाल होत आहेत. आमची समस्या सोडवावी, असे निवेदनात म्हटले आहे.

तसेच राज्य सरकारने परिवहन बसमध्ये महिलांसाठी मोफत प्रवासाची सोय केली आहे, ती आमच्यासाठी तोट्याची आहे. आमची मागणी तातडीने पूर्ण करावी, अशी विनंती त्यांनी मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडे केली.

यावेळी सीएच राचन्नावर , हिफाजुर टोपीनकट्टी, इमामसाब जिगलुर, रियाझ हिरेकुडी, महांतेश अयत्ती आदी उपस्थित होते.

Tags: