महिला व बालविकास मंत्री, ज्येष्ठ नागरिक व अपंग सक्षमीकरण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सवदत्ती तालुक्यातील करिकट्टी जवळील त्यांच्या मालकीच्या हर्षा साखर कारखान्याला भेट देऊन कामगारांच्या कामाची माहिती घेतली व कामगारांचा सन्मान केला.


हर्षा साखर कारखान्यासाठी कामगारांनी घेतलेली मेहनत लक्षात घेऊन त्या म्हणाल्या कि , “मी हा साखर कारखाना नफ्यासाठी बांधलेला नाही, तर कामगारांनी स्वत:चे आयुष्य घडावे यासाठी मी हा साखर कारखाना उभारला आहे. कामगार हा या कारखान्याचा कणा आहे. देश आणि आपण कामगारांनी बनलेले आहोत. कामगारांना लागणाऱ्या सर्व सुविधा मी उपलब्ध करून दिल्या आहेत.

त्यांनी कारखान्याच्या व्यवस्थापनाची संपूर्ण माहिती घेतली व कारखान्यातील इथेनॉल युनिट, स्पिरीट युनिट, साखर मिल आदी ठिकाणांची पाहणी केली.
यावेळी विधान परिषद सदस्य तथा हर्षा शुगर्सचे व्यवस्थापकीय संचालक चन्नराज हट्टीहोळी , महाव्यवस्थापक सदाशिव थोरात, एन.एम. पाटील, मुख्य प्रशासकीय अधिकारी उमाकांत चौकीमठ, संबंधित विभागाचे प्रमुख व कर्मचारी, कामगार आजूबाजूचे ज्येष्ठ शेतकरी, महांतेश मत्तीकोप्पा, अडीवेश इटगी आदी या वेळी उपस्थित होते.


Recent Comments