Belagavi

हिंडाल्कोतर्फे काकती शाळेत मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

Share

विद्यार्थीदशेत चांगले शिक्षण घेऊन संस्कृतीचे रक्षण करा असे आवाहन हिंडाल्को कंपनीचे एचआर मॅनेजर मयूर कृष्ण यांनी केले.
हिंडाल्को कंपनीच्या वतीने बेळगाव तालुक्यातील काकती गावातील शासकीय वरिष्ठ प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बॅग, वह्या व इतर साहित्याचे वाटप केल्यानंतर बोलताना एचआर मॅनेजर मयूर कृष्ण यांनी, विध्यार्थ्यांना चांगले शिक्षण घ्या, ज्येष्ठांचा आदर करा, आपले भविष्य घडवून आदर्श नागरिक बना असे आवाहन केले. हिंडाल्को कंपनीच्या वतीने येत्या काही दिवसांत आवश्यक साहित्य वाटप करून मूल्यशिक्षण देण्याची योजना आखली जाईल, असे त्यांनी सांगितले. बाईट.
कंपनीच्या एचआर विभागाचे अधिकारी महेश शेट्टी म्हणाले की, विद्यार्थ्याच्या आयुष्यात फक्त मार्क्स ही महत्त्वाची गोष्ट नाही. कठोर अभ्यास करा आणि आत्मविश्वासाने पुढे जा आणि भविष्य घडवा. मी नापास झाल्याची तक्रार न करण्याचा प्रयत्न केल्यास यश तुमच्यासाठी निश्चित आहे, असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. बाईट.
कार्यक्रमाचे अध्यक्ष एसडीएमसीचे उपाध्यक्ष कृष्णा कुरुबर यांनीही विचार मांडले. शिक्षक शिवानंद तल्लुर यांनी प्रास्ताविक केले. मुख्याध्यापिका सुमित्रा करविनकोप्प यांनी काकतीत नव्याने सुरू झालेल्या हायस्कूलला आवश्यक मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली. यावेळी प्रकाश उप्पार, महेश अक्की, गीता खनट्टी, शशिकला, व्ही के राजमाने, एस एम कराळे यांच्यासह प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळांचे सर्व कर्मचारी, शालेय मुले व एसडीएमसी सदस्य सहभागी झाले होते. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक बी एन मडीवाळर यांनी स्वागत केले. शिक्षिका श्रीदेवी मरकुंबी यांनी सूत्रसंचालन केले. शिक्षक एस एम हुबळी यांनी आभार मानले.

Tags: