Belagavi

बेळगाव महानगर पालिकेच्या स्थायी समितीची निवडणूक बिनविरोध

Share

बेळगाव महानगरपालिकेच्या स्थायी समित्यांची बिनविरोध निवडणूक पार पडली . ५: २ अशा समीकरणात चारही स्थायी समित्यांची निवडणूक बिनविरोध पार पडल्याने आ . अभय पाटील यांनी सर्व सदस्यांचे अभिनंदन केले .
बेळगाव मनपात , अर्थ आणि कर , आरोग्य आणि सामाजिक न्याय आणि नगर नियोजन आणि बांधकाम यासह लेख अशा चार स्थायी समित्या आहेत . महापौर , उपमहापौर निवडणुकीनंतर तब्बल तीन महिन्यांनी , ही निवडणूक बिनविरोध पार पडली . निवडणूक अधिकारी म्हणून , प्रभारी प्रादेशिक आयुक्त नितेश पाटील यांनी काम पहिले .
सकाळपासूनच या स्थायी समित्यांसाठी , नामपत्र भरण्याची प्रक्रिया सुरु होती . दुपारी ही निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडली . चार स्थायी समित्यांमध्ये प्रत्येकी सात अशी एकूण २८ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली .
अर्थ आणि कर समितीच्या सदस्यांमध्ये, वीणा विजापूर , रेखा हुगार , उदयकुमार उपरी , संदीप जिरग्याळ , प्रीती कंकर , रेशमा भैरकदार , शामोबीन पठाण , त्याचप्रमाणे , आरोग्य शिक्षण आणि सामाजिक न्याय समितीसाठी , रवी धोत्रे , रमेश मैलगोल ,रेशमा कामकर श्रेयस नाकाडी , जयंत जाधव , खुर्शीद मुल्ला , इकरा मुल्ला , तसेच नगर नियोजन आणि विकासास स्थायी समितीसाठी , वाणी जोशी , आनंद चव्हाण , मंगेश पवार , संतोष पेडणेकर , रूपा चिखलदिनी , जरीना फतेहखान , शकील मुल्ला , आणि लेख स्थायी समितीसाठी सविता पाटील , गिरीश धोंगडी , अभिजित जवळकर , जयतीर्थ सौंदत्ती , पूजा पाटील , ज्योती कडोलकर , अफरोज मुल्ला आदींची बिनविरोध निवड करण्यात आली आहे .
या सर्वांचे आ . अभय पाटील यांनी अभिनंदन करून , आगामी काळात बेळगावच्या सर्व जनतेचा विकास आणि शहराच्या सर्व ज्वलंत समस्येबद्दल , सर्व सदस्यांनी तसेच महापौर आणि उपमहापौर यांनी सर्वानी मिळून एकत्रित काम करावे असे आव्हान केले .
यावेळी खा . मंगल अंगडी , आ . अभय पाटील , खा . अण्णासाहेब जोल्ले , तसेच महापौर शोभा सोमनाचे , तसेच उपमहापौर रेश्मा पाटील उपस्थित होत्या .

Tags: