ज्ञानोबा माउली तुकाराम , विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल असा जयघोष करीत ,वारकरी पेहरावात , मराठा मंडळ संस्थेच्या हायस्कुलच्या विद्यार्थ्यांच्या निघालेल्या पंढरीच्या वारीने सर्व जनतेचे लक्ष वेधून घेतले .
व्हॉईस ओव्हर : वारकरी वेशात , कपाळावर चंदनाचा टिळा ,मुखाने श्री पांडुरंगाच्या आणि संतांच्या नावाचा जयघोष करीत , टाळ मृदूंगाच्या गजरात मराठा मंडळ संस्थेच्या सेंट्रल हायस्कुल , जिजामाता हायस्कुल , तसेच मराठा मंडळ हायस्कुल च्या विद्यार्थ्यांची वारी काढण्यात आली .
विठ्ठल रखुमाई , संत ज्ञानेश्वर आणि अन्य संतांची वेशभूषा केलेली मुले , विठ्ठल रखुमाईच्या सजवलेली पालखी , आणि पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीने निघालेल्या वारकऱ्यांच्या वेशातील मुले पाहून , साक्षात देहू आळंदी ते पंढरपुर अशा पायी वारीचा होत होता .
यासंदर्भात माहिती देताना जिजामाता हायस्कुलचे मुख्याध्याप एन डी पाटील यांनी ही वारी आयोजित करण्याचा उद्देश सांगितला . सर्व प्रापंचिक सुखे फिकी पडतील अशी पंढरीची वारी एकदातरी अनुभवावी असे म्हटले जाते . अशा पंढरपूर वारीत सहभागी होता आले नाही तरी जीवनात एकदा तरी ही वारी अनुभवता यावी या उद्देशाने ह्या वारीचे आयोजन केले आहे . आमच्या मराठा मंडळ संस्थेच्या तिन्ही शाळातील सुमारे ७०० ते ८०० विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले आहेत . असे सांगून त्यांनी संत मंडळी आणि वारीचे महत्व सांगितले .
ही वारी मराठा मंडळ हायस्कुलच्या आवारातून सुरु झाली . त्यानंतर चव्हाट गल्ली , आरटीओ सर्कल मार्गे , कोर्ट आवारातून पुन्हा शाळेच्या आवारात आणण्यात आली . याठिकाणी रिंगण सोहळ्याचे देखील आयोजन करण्यात आले होते .
यावेळी तिन्ही शाळांचे मुख्याध्यापक , शिक्षक विद्यार्थ्यांनी पंढरीच्या वारीचा आनंद लुटला .
Recent Comments