Belagavi

नूतनीकरणकृत हॉटेल शिवसागरचे थाटात उदघाटन

Share

बेळगावातील मारुती गल्लीतील नूतनीकरणकृत हॉटेल शिवसागरचा उदघाटन समारंभ आज थाटात पार पडला.
होय, गेली 9 वर्षे बेळगावकर आणि बाहेरगावच्या खवय्यांच्या रसना तृप्त करणाऱ्या आणि यंदा दहाव्या वर्षात पदार्पण केलेल्या हॉटेल शिवसागरचे सुंदर नूतनीकरण करण्यात आले आहे. यानिमित्त त्याचा उदघाटन समारंभ आज आयोजित करण्यात आला होता. यावेळी गुन्हे आणि वाहतूक विभागाच्या डीसीपी स्नेहा पी. व्ही., ग्रुप ऑफ पंजुर्ली हॉटेल्सचे अध्यक्ष राजेंद्र शेट्टी आदी मान्यवरांची उपस्थिती होती. बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील, ज्येष्ठ हॉटेल उद्योजक आणि हेगडे ग्रुप ऑफ हॉटेल्सचे अध्यक्ष विठ्ठल हेगडे यांच्याहस्ते फीत सोडून नूतनीकरणकृत हॉटेल शिवसागरचे शानदार समारंभात उदघाटन करण्यात आले.


यावेळी शुभेच्छा देताना ज्येष्ठ हॉटेल उद्योजक विठ्ठल हेगडे म्हणाले की, आजकाल हॉटेल व्यवसाय खूप कष्टाचा झाला आहे. यात अनेक अडचणी येतात. तशातही राजेश शेट्टी यांनी धाडस दाखवून गेली 9 वर्षे यशस्वीपणे हॉटेल शिवसागर चालवून दहाव्या वर्षात पदार्पण करत आहेत. आज त्यांच्या नूतनीकरणकृत हॉटेलचे उदघाटन होत आहे. देवाच्या कृपेने त्यांनी या व्यवसायात आणखी यश मिळवावे अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. बाईट.
यावेळी बोलताना ग्रुप ऑफ पंजुर्ली हॉटेल्सचे अध्यक्ष राजेंद्र शेट्टी म्हणाले की, ग्राहकांचा विश्वास कमावून राजेश शेट्टी यांनी हॉटेल शिवसागर यशस्वीपणे चालवले आहे. हा व्यवसाय खूप त्रासाचा झाला असूनही त्यांनी अन्नपदार्थांच्या दर्जाशी कसलीही तडजोड न करता ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. त्यांच्या व्यवसायाची आणखी भरभराट व्हावी अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. बाईट.
यावेळी मनोगत व्यक्त करताना हॉटेल शिवसागरचे मालक राजेश शेट्टी यांनी सांगितले की, आमच्या हॉटेलमध्ये ग्राहकांना नॉर्थ इंडियन, साऊथ इंडियन व प्रादेशिक असे सर्व प्रकारचे दर्जेदार खाद्यपदार्थ उपलब्ध करून दिले जातात. गेल्या नऊ वर्षात आम्ही ग्राहकांच्या आवडीनुसार दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध करून देत आहोत. हीच परंपरा यापुढेही सुरु ठेवणार आहोत. त्यासाठी ग्राहकांनी आम्हाला सहकार्य करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. बाईट.
हॉटेल शिवसागरच्या उदघाटनानिमित्त धार्मिक पूजेचे आयोजन करण्यात आले होते. डीसीपी स्नेहा, सुदीप शेट्टी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावून हॉटेल उद्योजक राजेश शेट्टी यांना शुभेच्छा दिल्या.

Tags: